अभिनेत्री विशाखा सुभेदार ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी त्याच्या अभिनयाद्वारे आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर कधी काय हिट होईल काहीही सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाकिस्तानी गायक-अभिनेते अली झाफर यांचे एक गाणे ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुन रे सजनिया असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्यावर आतापर्यंत अनेक सोशल मीडिया युजर्सने रिल व्हिडीओ केले आहेत. त्यानंत आता या गाण्यावर डान्स करण्याचा मोह कलाकारांनाही आवरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. विशाखा सुभेदार ही इन्स्टाग्रामवर कायमच विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर करते. याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच तिने या गाण्यावर एक रिल शेअर केला आहे.
आणखी वाचा : “एखादी जाडी बाई…” विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत
यात ती पाकिस्तानी गायक अली झाफर यांच्या सुन रे सजनिया या गाण्यावर नाचताना दिसत आहे. सून रे sajniya…. गाणं इतकं मस्त आहे की कायम नाचवंसं वाटत.. म्हणून मग झाले लहान, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. त्याबरोबर तिने अनेक हॅशटॅगही शेअर केले आहेत.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर पुढे काय करणार? विशाखा सुभेदारने केला खुलासा
तिने शेअर केलेले हे रिल सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करतानाही दिसत आहेत. सध्या विशाखा ही तिच्या कुर्रर्रर्र या नाटकात व्यस्त असल्याचे दिसत आहे. तसेच लवकरच ती एका चित्रपटात झळकणार असल्याचेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.