झी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ शोला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. अभिनेता सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे. कलाविश्वासह इतर क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिला या शोमध्ये सहभागी होतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने हजेरी लावली.
विशाखाने विचारलेल्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे देत कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी तिने तिचा लोकलमधील अनुभवही शेअर केला. करिअरच्या सुरुवातीला तिला रोज अंबरनाथ ते दादर असा प्रवास करावा लागायचा. त्यावेळच्या आठवणी तिने कार्यक्रमात शेअर केल्या. कर्जतवरून येणाऱ्या चालत्या लोकलच्या पहिल्या महिल्या डब्यात अंबरनाथवरून स्टेशनवरून चढत असल्याचंदेखील विशाखाने सांगितलं. त्याकाळी लोकलच्या प्रवासात वस्तूही विकल्या असल्याचं सांगत तिने करिअरच्या सुरुवातीच्या काळातील खडतर प्रवासाच्या आठवणी सांगितल्या.
हेही वाचा >> अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह कलाकारांना १० लाख भरण्याचे न्यायालयाचे आदेश; वाचा नेमकं प्रकरण काय?
हेही वाचा >> “लग्न करायचे म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने सांगितला ‘त्या’ चाहत्याचा भयानक किस्सा
विशाखा म्हणाली, “मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी मी शाळेत शिक्षिका होते. तेव्हा मी आकाशवाणीलाही काम करायचे. दुपारी एक वाजता शाळा सुटली की मी लोकल पकडून विटीला जायचे. उल्हासनगरवरून मी ड्रेस मटेरिअल घ्यायचे. आणि या लोकलच्या प्रवासात ते विकायचे. लिपस्टिक, नेलपेंटचा होलसेलने घेतलेला स्टॉकही मी लोकल आणि आकाशवाणीमधील महिलांना विकायचे. त्यामुळे आयुष्यातील लोकलप्रवास हा अविस्मरणीय आहे”.
हेही पाहा >> Photos : ‘सैराट’मधील आर्चीचं खरं नाव माहीत आहे का?, रिंकू नाही तर…
“लोकलमध्ये वेफर्स, नेलपेंट विकणाऱ्या महिलांशीही माझी मैत्री होती. त्या मला नावाने ओळखत होत्या. नंतर कलाक्षेत्रात आल्यानंतर प्रयोग असल्यावर मी कायम शेवटची लोकल पकडून दोन सव्वा दोनला घरी जायचे. लोकलमधील तृतीयपंथियांचीही मला या रात्रीच्या प्रवासात साथ मिळायची. मला कधीच त्यांची भीती वाटली नाही. त्यामुळे या लोकल प्रवासातील खूप आठवणी माझ्याजवळ आहेत”, असं म्हणत विशाखाने तिच्या लोकलमधील प्रवासाच्या आठवणी शेअर केल्या.