गेल्या दोन महिन्यांत हिंदी चित्रपटांची तिकीटबारीवरची कमाई प्रचंड प्रमाणात गडबडली आहे. एरव्ही जून-जुलै महिन्यात फारसे चित्रपट प्रदर्शित केले जात नाहीत. पाऊस, नुकत्याच सुरू झालेल्या शाळा अशी अनेक कारणं यामागे असतात. तरीही यंदा जूनपासून हिंदीबरोबरच मराठी चित्रपटही सातत्याने प्रदर्शित होत आहेत. तिकीटबारीवरच्या कमाईची गणितं घडोत वा बिघडोत.. सध्या मोठय़ा प्रमाणावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा सिलसिला सुरूच असून यात हिंदी चित्रपटांवरही मराठी चित्रपट भारी पडताना दिसत आहेत.

साधारणत: जून-जुलै या दोन महिन्यांत चित्रपट प्रदर्शनावर भर दिला जात नाही, मात्र त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात चित्रपटांची प्रदर्शनासाठी एकच तारांबळ उडते. ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या सुट्टय़ा आणि दहीहंडी, गणेशोत्सवासारखे मोठे सण यामुळे चित्रपट प्रदर्शनासाठी एकूणच रस्सीखेच सुरू असते. हिंदीत ही स्पर्धा कायमच मोठी असते. त्याची चुणूक गेल्या आठवडय़ात रक्षाबंधनच्या निमित्ताने एकाचवेळी प्रदर्शित झालेल्या ‘लालसिंह चढ्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ या दोन बिग बजेट हिंदी चित्रपटांवरून येते. मराठीतही ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात ‘एकदा काय झालं’ आणि  ‘दे धक्का २’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र यातली लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांपेक्षाही मराठी चित्रपटांची संख्या अधिक आहे. या दोन महिन्यात मिळून हिंदीत सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, तर मराठीत एकूण १४ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

या महिन्यात हिंदीतील बिग बजेट चित्रपटांचा गेला आठवडा वगळता पुढच्या दोन आठवडय़ात मिळून चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या आठवडय़ात ‘टका टक २’ आणि ‘दगडी चाळ २’ असे दोन मोठे आणि गाजलेले सिक्वलपट एकाचवेळी प्रदर्शित होणार आहेत. ‘टका टक २’ या मिलिंद कवडे दिग्दर्शित चित्रपटात प्रथमेश परब, अजिंक्य राऊत अशी तरुण कलाकार मंडळी आहेत तर  ‘दगडी चाळ २’ या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत असे नामवंत चेहरे आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या भागांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे सिक्वलपटांनाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास निर्माते – वितरक व्यक्त करताना दिसतात. याशिवाय, ‘समायरा’ हा नवोदित अभिनेत्री केतकी नारायण आणि हिंदीतून परिचयाचा झालेला अभिनेता अंकुर राठी यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट, राष्ट्र एक रंगभूमी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. मराठीतील पाच चित्रपटांच्या तुलनेत हिंदीत चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेला ‘सीता रामन’ हा मूळ दाक्षिणात्य चित्रपट आहे. सप्टेंबर महिन्यातही प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची संख्या हिंदीच्या तुलनेत अधिक आहे.

 करोनाकाळात रखडलेल्या मराठी चित्रपटांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच मराठी चित्रपटांचे मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शन सुरू झाले होते. जानेवारी-फेब्रुवारीपासून दर आठवडय़ाला तीन ते चार मराठी चित्रपट सातत्याने प्रदर्शित झाले. एप्रिल-मे महिन्यापर्यंत हे प्रमाण कायम होतं. जून-जुलैमध्ये प्रदर्शन कमी असते. त्यामुळे आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यावर निर्माते आणि वितरकांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती चित्रपट व्यवसायातील जाणकारांनी दिली. या काळात सुट्टी आणि सणांचा माहौल असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे मोठय़ा प्रमाणावर वळतील, असा विश्वास चित्रपट व्यावसायिकांना वाटतो आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते. सप्टेंबरमध्ये एकूण आठ मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पहिल्या आठवडय़ात ‘शक्तिमान’, दुसऱ्या आठवडय़ात ‘बेभान’ आणि ‘हरि ओम’ असे दोन चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होणार आहेत. सप्टेंबरमधील एक आठवडा वगळता दर आठवडय़ाला दोन मराठी चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होणार असल्याने मराठी चित्रपटांची आपापसांतच स्पर्धाही पाहायला मिळणार आहे. ‘बॉईज ३’ या सिक्वलपटासह ‘रुपनगर के चिते’, ‘नेबर्स’, ‘बालभारती’ आणि ‘बाईपण भारी देवा’ असे चार मराठी चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत.

Story img Loader