बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची उत्सुकता आणि इच्छा प्रत्येकाची असते. पण १०० दिवस तिथे रहाणे हे काही सोपे नसते. घरच्यांना, आपल्या प्रिय व्यक्तींना मागे सोडून इतके दिवस त्यांच्याशिवाय राहायचे काही सोपे नाही. कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला विनीत भोंडेची मंचावर एन्ट्री झाल्यानंतर त्याला एक सुंदर सरप्राइज मिळाले. महेश मांजरेकर यांनी विनीत भोंडेच्या पत्नीला मंचावर बोलावले. आपल्या पत्नीला मंचावर पाहून विनितच्या आनंदाला पारावर उरला नाही. विनीत बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर त्याची पत्नी खास त्याला भेटण्यासाठी बिग बॉसच्या मंचावर आली होती.
विनीतचे नुकतेच लग्न झाले असून त्याला लग्नानंतर काही दिवसांतच बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची विचारणा झाली. पण, लग्न झाल्यानंतर लगचेच इतके दिवस बायकोपासून दूर कसं रहाणार? हा प्रश्न समोर होताच. पण बायकोने कामास प्राधान्य दिले आणि मला कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास पाठींबा दिला. मी माझ्या बायकोमुळेच या मंचावर आहे असे तो म्हणाला. विनीतच्या बायकोने त्याला एक छानसा कुटंबासोबतचा फोटो घरी घेऊन जाण्यास दिला. विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाणारा दुसरा सदस्य होता, त्याआधी रेशम टिपणीस घरामध्ये गेली होती.
विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाताच त्याला घरातील प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल आहे हे दिसून आले आणि प्रत्येक गोष्टी तो खूपच बारकाईने पाहत होता. त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक सदस्याला त्याने स्वत: बिग बॉसचे घर दाखवले. घरातील प्रत्येक कोपऱ्यास आणि प्रत्येक भागाला त्याने खूपच गमतीशीर प्रकारे प्रत्येकाला दाखविले. विनीतचे प्रश्न, त्याचा हजरजवाबीपणा, त्याचा मिश्कील स्वभाव प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही! या घरामध्ये पुढे काय होणार आहे, कोण कसे वागणार आहे हे कोणी सांगू शकत नाही. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी फक्त कलर्स मराठीवर.