‘बालक पालक’ या मराठी चित्रपटाद्वारे निर्मितीत उतरलेल्या रितेश देशमुखने बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोच्या धर्तीवर ‘मराठी बिग बॉस’ कार्यक्रमाची घोषणा केली होती. परंतु त्याबाबत निश्चित असे काही घडलेले नसून कार्यक्रमाची संकल्पना ठरलेली नाही. त्यामुळे यावर्षी तरी ‘मराठी बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शो टीव्हीवर झळकणार नाही, असे आता रितेशने स्पष्ट केले आहे.
 ‘मराठी बिग बॉस’ कार्यक्रमाचे स्वरूप, संकल्पना, निर्मिती, दिग्दर्शन याबाबत काहीही अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे यावर्षी तरी हा रिअ‍ॅलिटी शो झळकू शकणार नाही, असे रितेशने म्हटलेय.

Story img Loader