‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अक्षयचे सगळीकडे कौतुक होत आहे. अशातच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा त्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अक्षय केळकर सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याने अभिनेत्री समृद्धी केळकरच्याबरोबर एक डान्स रील शेअर केले आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या एका गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. त्याने या व्हिडीओला कॅप्शन दिला आहे की मी हरत नसतो! मी समोरच्याला जिंकून देत नाही! मी डान्स चुकत नसतो समोरच्याला चुकवतो! बिग बॉस सांगू इच्छितात हे कार्य अनिर्णित राहिले आहे. असा कॅप्शन दिला आहे.
“त्याचं प्रसिद्ध अभिनेत्रीशी अफेअर असतं तर…” राखी सावंतचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
अक्षयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने लिहले आहे ‘हे भारी होतं,’ तर दुसऱ्याने लिहले आहे ‘खूप मजेशीर व्हिडीओ आहे.’ तर या व्हिडिओवर कलाकारांनीदेखील कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री आणि माजी बिग बॉस स्पर्धक अमृता धोंगडे हिने लिहले आहे ‘असच पाहिजे तुला,’ तर अभिनेत्री स्नेहलता वसईकरने लिहले आहे’ हा डान्स ड्रॉ झाला आहे.’
अक्षय केळकर व समृद्धी केळकर याआधी एका गाण्यात दिसले होते. अक्षय हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.