बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शो मधून घराघरात प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून नेहा शितोळेला ओळखले जाते. नेहा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतंच नेहाने दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने महेश मांजरेकर यांचे कौतुक केले आहे.

नेहा शितोळेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने महेश मांजरेकरांचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत ती फार आनंदात असल्याचे दिसत आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे. तिचे हे कॅप्शन सध्या चांगलेच चर्चेत आहे.

shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

आणखी वाचा- De Dhakka 2 Trailer : जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडीचा तडका, ‘दे धक्का २’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

नेहा शितोळेची इन्स्टाग्राम पोस्ट

Mahesh Manjrekar – महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता भेटणं सुद्धा जिथे कमाल वाटतं तिथे त्यांनी तुम्हाला appreciate करणं, त्यांच्या सोबत काम करायला मिळणं आणि त्यांचं थोडं प्रेम आपल्या वाट्याला येणं… हे सगळं अविश्वसनीय आहे… धन्यवाद महेश मांजरेकर सर… माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल… एका वेगळया रुपात लोकांसमोर आणल्याबद्दल… माझ्या शब्दांना योग्य न्याय दिल्याबद्दल…, असे नेहा शितोळेने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान नेहा शितोळे ही लवकरच गीतकार म्हणून पदार्पण करत आहे. तिने महेश मांजरेकराच्या आगामी दे धक्का २ या चित्रपटासाठी गाणे लिहिले आहे. ‘देह फुटू दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. अद्याप तिचे हे गाणे प्रदर्शित झालेले नाही. काही दिवसांपूर्वी नेहा ही सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या वेबसीरिजला नुकतंच चार वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने नेहाने एक खास रीलसुद्धा शेअर केलं होतं.

Story img Loader