आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहोचल्यावर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न साकार होताना पाहण्याची संधी बऱ्याचजणांना मिळते. त्याच बऱ्याचजणांपैकी एक म्हणजे अभिनेता सचिन पिळगावर. मराठी चित्रपट विश्वात आपल्या कर्तृत्त्वाने लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्याच्या दारात आता ‘ती’ दिमाखात उभी आहे. तिच्या येण्याने पिळगावकर कुटुंबिय फारच आनंदात आहेत. ‘ती’ म्हणजे नेमकी कोण, असाच प्रश्न तुम्हाला पडलाय ना?
पिळगावर कुटुंबाने नवी कोरी ‘जीप’ खरेदी केली आहे. सचिन पिळगावकर यांनी नुकतेच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन आपल्या नव्या कारचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ते नव्या कोऱ्या ‘जीप’ कारसोबत दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. फोटोत त्यांची पत्नी सुप्रियादेखील दिसत असून, त्यासुद्धा फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळते. ‘ड्रायव्हिंग होम अ जीप टुडे’ असे वाक्य लिहिलेला छोटासा बॅनर हातात पकडून सचिन आणि सुप्रियाने आपला आनंद व्यक्त केला. हा फोटो पोस्ट केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच पिळगावकर यांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.