अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला ‘सैराट’ करून सोडले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच ‘सैराट’मधील सर्व गाणी हिट झाली आहेत. चित्रपटाबाबत सर्वांची उत्सुकता शीगेला पोहोचली आहे. ‘झिंगाट’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी खुद्द अजय-अतुलनेही या गाण्यावर बेधुंद डान्स केला होता. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. झिंग झिंग झिंगाट म्हणत कलाकारांनी गाण्यावर अफलातून डान्स केला. झी स्टुडिओने हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पोस्ट केला असून, त्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा