‘एका निर्जन बेटावर नऊ अनोळखी लोक एकत्र येतात. हळूहळू त्यांच्यापैकी एक एक व्यक्तीचा खून होत जातो. खुनी आपल्यापैकीच कोणीतरी एक आहे, याची जाणीवही त्यांना असते. मात्र तो खुनी कोण, हे रहस्य शेवटपर्यंत उलगडत नाही..’ इंग्रजी साहित्याची आवड असणाऱ्या कोणालाही हा कथासार वाचून आगाथा ख्रिस्ती या सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिकेच्या तेवढय़ाच गाजलेल्या ‘अ‍ॅण्ड देन देअर वेअर नन’ या कादंबरीची आठवण होईल. याच कादंबरीवर आधारित ‘अशाच एका बेटावर’ हा मराठी चित्रपट ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
१९६५मध्ये हिंदीत आलेला ‘गुमनाम’ हा रहस्यपटही याच कादंबरीवर आधारित होता. मात्र आम्ही केवळ कादंबरीतील कथासार सारखा ठेवून बाकी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ही कादंबरी १९४०च्या दशकातील असल्याने त्या काळातील काही संदर्भ आता हद्दपार झाले आहेत, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक संजू हिंगे यांनी सांगितले.
‘गुमनाम’ चित्रपटातील ‘गुमनाम है कोई’ हे गूढगीत गाजले होते. आमच्या चित्रपटाला आम्ही अशाच एका गूढ गीताचा आधार घेतला आहे. हे गीत मराठीतील तेवढय़ाच गाजलेल्या ‘हा खेळ सावल्यांचा’ या गीताचीही आठवण करून देईल. हे गीत जुन्या पठडीतील असणे आपल्याला अपेक्षित होते. त्यासाठीच आपण हे गीत सदानंद डबीर यांच्याकडून लिहून घेतले, असे हिंगे यांनी स्पष्ट केले. हे गीत मिलिंद जोशी यांनी स्वरबद्ध केले असून ते देवकी पंडित यांनी गायले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा