मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत ज्यांनी चाहत्यांचा मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. हे खास आणि जुने चित्रपट आजही चाहते तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला.’ या चित्रपटात मराठीमधील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे मुख्य भूमिकेत होते. शिवाय दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.

या चित्रपटाची आजही लोक आठवण काढतात. आज १६ एप्रिल रोजी या चित्रपटाला ३० वर्षं पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात ‘तात्या विंचू’ हा बोलक्या बाहुल्याचं पात्र अजरामर करणारे रामदास पाध्ये यांचे सुपुत्र सत्यजित पाध्ये यांनी याची आठवण एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून करून दिली आहे. सत्यजित यांनी आपल्या वडिलांचाच वारसा पुढे नेत बोलक्या बाहुल्यांच्या कलेला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलं आहे. आज जगभरात त्यांचं यासाठी कौतुक केलं जातं.

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
hrithik roshan share karan arjun movie memory
शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन

आणखी वाचा : हनी सिंगचं ‘लुंगी डान्स’ हे गाणं शाहरुख खानला आवडलं नव्हतं; रॅपर म्हणाला, “घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर…”

‘झपाटलेला’ चित्रपटात ‘तात्या विंचू’ची प्रेक्षक आजही आठवण काढतात. त्याच्या ‘ओम फट स्वाहा’ या डायलॉगवर तर चिक्कार मीम्सदेखील बनले आहेत. याच अजरामर पात्राला दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट सत्यजित पाध्ये यांनी लिहिली आहे. याबरोबरच त्यांनी चित्रपटाच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

सत्यजित आपल्या पोस्टमध्ये लिहितात. “३० वर्ष… हो.. झपाटलेला ह्या सिनेमाला आज ३० वर्ष पूर्ण होत आहेत. १६ एप्रिल १९९३ ह्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला आयकॉनिक बनवला…तात्या विंचू हे पात्र सुद्धा भारतीय व मराठी सिनेमाच्या इतिहासातलं एक अविभाज्य घटक बनलं. आज २०२३ साल आहे आणि आमच्या तात्या विंचूची लोकप्रियता दर वर्षी वाढतच आहे. सोशल मीडियाच्या युगात आज त्याच्यावर अनेक memes बनत आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जी मुलं १९९३ ला जन्माला सुद्धा आली नव्हती, त्यांना सुद्धा आमचा तात्या विंचू आवडतो. या निमित्ताने, आम्ही (झपाटलेला आणि झपाटलेला २ ची संपूर्ण टीम) आमच्या लाखो चाहत्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हे घडवून आणले. आमच्या तात्या विंचूवर असेच प्रेम करत रहा. ह्या निमित्याने, झपाटलेला ह्या सिनेमाची काही पडद्यामागची छायाचित्रे आम्ही शेअर करत आहोत.”

‘झपाटलेला’ हा मराठीतील एक कल्ट क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. महेश कोठारे यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. २०१३ साली याचा दूसरा भाग म्हणजेच ‘झपाटलेला २’ प्रदर्शित झाला ज्यात आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपूरे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पहिल्या चित्रपटाप्रमाणे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात तो तितका यशस्वी ठरला नाही.