59th Maharashtra State Film Awards: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा व मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आज (२१ ऑगस्ट रोजी) वरळीतील डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये पार पडला. या सोहळ्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य सरकारने ५८ वे आणि ५९ वे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार एकाच वेळी प्रदान केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासनामार्फत ५८ आणि ५९ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यंदा एकाच वेळी प्रदान करण्यात आले. २०२३ मधील चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (१० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना ‘सीआयडी’ या मालिकेतील ‘एसीपी प्रद्युम्न’ या भूमिकेसाठी, तर स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार (१० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना या पुरस्कार सोहोळ्यात प्रदान करण्यात आला.

“मला नेहमी सचिनची बायको म्हणतात…”, सुप्रिया पिळगांवकर यांचं वक्तव्य; जया ‘अमिताभ’ बच्चन वादाबद्दल म्हणाल्या…

यासोबतच, २०२३ चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (६ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) लेखक-दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल लांजेकर यांना तर  स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार (६ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) जेष्ठ लेखक- दिग्दर्शक- संकलक एन. चंद्रा यांना प्रदान करण्यात आला.

सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध

यासोबतच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आला. प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना सन्मानित करण्यात आला.

“विराट कोहली उत्तम अभिनेता, पण त्याने चित्रपटांमध्ये येऊ नये; निवृत्तीनंतरही नाही”

या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 59th maharashtra state film awards shivaji satam asha parekh honoured by government check winners list hrc