National Film Awards 2023 Updates : नुकतीच ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. कलाविश्वातील दिग्गज कलाकार मंडळींना या मानाच्या पुरस्काराने आजवर गौरवण्यात आलं आहे. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातदेखील ज्युरी यांना पसंत पडलेल्या आणि एकूणच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या चित्रपटांची अचूक सांगड बघायला मिळाली आहे. ‘पुष्पा’साठी अल्लू अर्जुनला उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार हा आलिया भट्ट आणि क्रीती सेनॉन या दोघींना ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘मिमी’ या चित्रपटांसाठी विभागून देण्यात आला. लोकांनी भरभरून प्रेम दिलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’लासुद्धा नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हिंदी चित्रपटांबरोबरच यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटानेही बाजी मारलेली आहे.

आणखी वाचा : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, ‘द काश्मीर फाइल्स’ने कोरले ‘या’ पुरस्कारावर नाव

यंदाचा उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा ६९ वा राष्ट्रीय पुरस्कार ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला जाहीर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या वर्षी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) मध्येदेखील या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग ठेवलं होतं. या चित्रपटाची चांगलीच प्रशंसा झाली शिवाय प्रेक्षकांनाही यातील कथानक आणि कलाकारांच्या कामाचं खूप कौतुक केलं.

अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन अशी तिहेरी जवाबदारी डॉ. सलील कुलकर्णी यांनी पार पाडली. एकूणच वेगळ्या धाटणीचा अन् प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल याच्या निर्मात्यांचे अभिनंदन.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 69 national film award 2023 list out marathi film ekda kay jhala won award in best film category avn
Show comments