69th National Film Awards Ceremony Updates in Marathi : चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना दरवर्षी भारत सरकारकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जातात. यापूर्वी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘एकदा काय झालं’ या मराठी चित्रपटाने मोहोर उमटवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला लग्नातील साडी नेसून पोहोचली आलिया भट्ट, पाहा व्हिडीओ

गायक, संगीतकार आणि आता दिग्दर्शन क्षेत्रात उतरलेल्या सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी या चित्रपटात गोष्ट सांगणाऱ्या बाबांची कहाणी सादर केली आहे. त्यांच्या पहिल्याच कलाकृतीचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाल्याने सध्या कलाविश्वातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘टायगर ३’मधले सीन्स कापल्याने इम्रान हाश्मी ‘YRF’वर नाराज; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा दावा

पुरस्कार मिळाल्यावर सलील कुलकर्णींनी फेसबुक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. “हा पुरस्कार तुमचा आहे. अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या पावलांना काही खुपू नये म्हणून माझ्या प्रत्येक पावलाखाली तिचा तळवा ठेवत आलेली माझी आई…आणि…ज्यांनी उद्याकडे बघायला कारण दिलं…ज्यांच्यामुळे प्रत्येक नवीन दिवस खऱ्या अर्थाने उजाडतो…ते शुभंकर आणि अनन्या” अशी पोस्ट शेअर करत दिग्दर्शकाने या यशाचं संपूर्ण श्रेय त्यांच्या आईला व मुलाला दिलं आहे.

हेही वाचा : रुग्णवाहिका चालक ते सिनेमॅटोग्राफर; डिस्नेलँडची निर्मिती कशी झाली ?

दरम्यान, ‘एकदा काय झालं’ या चित्रपटात वडील आणि मुलाचं नातं अतिशय सुंदररित्या मांडलं आहे. यामध्ये सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, सुहास जोशी, पुष्कर जोशी, मोहन आगाशे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.