सध्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. संपूर्ण महााराष्ट्रातून या चित्रपटाचे कौतुक होताना पहायला मिळत आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका खूप गाजत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर वंदना गुप्तेना एका नव्या भूमिकेची ऑफर मिळाली आहे.
हेही वाचा- Video : दीपाली सय्यद यांनी भर पावसात भाजले मक्याचे कणीस, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाल्या “१० रुपये…”
एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, या चित्रपटाच्या यशानंतर मला नव्या भूमिकेची ऑफर आली आहे. पण सध्या मी बाईपणच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळे मी त्या ऑफरकडे अजून लक्ष दिलेलं नाही.”
हेही वाचा- “मी ज्या चित्रपटात असते तो…”; ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर सुचित्रा बांदेकरांचे मोठं वक्तव्य
दरम्यान या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत. स्त्रीयांवर आधारित या चित्रपटाला पुरुष वर्गाकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. तीन आठवड्यानंतरही चित्रपटाला प्रेक्षक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत.
३० जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यातील रविवारी तब्बल ६.६० कोटींची विक्रमी कमाई केली. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींचा गल्ला जमवला होता. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.