अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आतापर्यंत त्या विविध मालिका, चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्या त्यांच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. पण आता त्यांच्या बादललेल्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. आता त्यांच्या या नव्या लूकवर त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने प्रतिक्रिया दिली आहे.
सुचित्रा बांदेकर लवकरच केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी मेकओव्हर केला आहे. या चित्रपटासाठी त्यांनी केसांना लाल रंगाने हायलाईट केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांचा हा बदललेला लूक पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. आता त्यांच्या या नव्या लूकवर त्यांच्या मुलाने प्रतिक्रिया दिली आहे.
‘बाईपण भारी देवा’ची टीम सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. यानिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये सुचित्रा बांदेकर चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल सांगत आहेत. या चित्रपटात त्या ‘पल्लवी’ हे पात्र साकारत आहेत. आता त्यांचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत त्याच्या आईच्या नव्या लूकवर प्रतिक्रिया देत सोहमने लिहिलं, “हाच लूक कंटिन्यू कर आता.” याचबरोबर त्याने रेड हार्ट आणि हसण्याचे इमोजी त्याला दिले.
हेही वाचा : “मी शूटींगला गेल्यावर आदेश…” पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी केला खुलासा
त्यामुळे सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाला त्यांचा हा नवीन लूक चांगलाच आवडलेला दिसत आहे. आता त्या लेकाची इच्छा ऐकणार की नेहमीच्या लूकमध्ये दिसणार हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.