दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मिळत आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कसा वाटला याबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच अभिनेते आदेश बांदेकर यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे घराघरात ‘भावोजी’ अशी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे आदेश बांदेकर. अभिनेते-सूत्रसंचालक म्हणून ते कायमच चर्चेत असतात. केदार शिंदे यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी आदेश बांदेकराबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आदेश बांदेकर हे केदार शिंदे यांना मिठी मारताना दिसत आहे. याबद्दल एक पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “ती समोर आली की…” केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “‘बाईपण भारी देवा’च्या निमित्ताने…”

केदार शिंदेंची पोस्ट

“गेली कित्येक वर्ष “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दार उघड बये दार उघड म्हणत, वहिनींना मानाची पैठणी देणारा, त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणारा..

आदेश बांदेकर याने काल बाईपण भारी देवा सिनेमा पाहून कडकडून मिठी मारली.. बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय”, अशी पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.

आणखी वाचा : “माझ्यासाठी उभे न राहणारे लोक…” उर्मिला मातोंडकरचे मोठे वक्तव्य, म्हणाली, “काही राजकारणी…”

दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट शुक्रवारी ३० जूनला प्रदर्शित झाला. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadesh bandekar first reaction after watch baipan bhari deva kedar shinde share post nrp