सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी स्वत:चे जीवन संपवले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले याबद्दल सर्वांनाच धक्का बसला आहे. आता त्यांच्या आत्महत्येवर अभिनेते आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीच्या लग्नात तो…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येवर सुबोध भावेची प्रतिक्रिया

‘एबीपी माझा’शी याबद्दल बोलताना ते म्हणाले, “कलादिग्दर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवण्यात नितीनचा खूप मोठा वाटा आहे आणि हे कोणीही नाकारू शकणार नाही. त्याच्या कामाबद्दल प्रत्येकालाच अभिमान वाटायचा. नितीन हा जगन्मित्र होता. त्याचं सर्वांशी उत्तम बोलणं, संवाद साधणं सुरू असायचं. नितीननं आत्महत्या करणं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. ज्या क्षणी मला ही बातमी कळली, त्या क्षणी मला फार वाईट वाटलं.”

हेही वाचा : Nitin Desai Suicide: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

पुढे ते म्हणाले, “त्यानं बोलायला हवं होतं, संवाद साधायला हवा होता; पण काहीच नाही. कधी त्याचा फोन आला, तर तो सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतोय, असं सांगण्यासाठी असायचा. अनेक टप्प्यांवर मी त्याचा प्रवास बघितला. विविध संकल्पनांसाठी आम्ही एकत्र काम केलं. अनेक मोठमोठ्या सोहळ्यांचं जेव्हा मी दिग्दर्शन करायचो तेव्हा तो असायचा. का त्यानं असं करावं हा प्रश्न पडलेला आहे.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadesh bandekar gave reaction about nitin desai suicide know about it rnv
Show comments