केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण बारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यामध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींचे सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ‘बाईपण बारी देवा’ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी नुकतीच एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी चित्रपट पाहिल्यावर आदेश बांदेकरांची प्रतिक्रिया काय होती? याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “सुकन्या तू…” ‘बाईपण भारी देवा’ बघितल्यावर संजय मोने जोरात म्हणाले…; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी अलीकडेच ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत ‘बाईपण बारी देवा’ पाहिल्यावर आदेश बांदेकरांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल त्यांच्या चाहत्यांना सांगितले. त्या म्हणाल्या, “सध्या सर्वत्र आमच्या चित्रपटाचे कौतुक सुरु आहे हे पाहून खरंच आनंद होतो. मोठ-मोठे लेख लिहून आम्हा सगळ्यांचे कौतुक केले जात आहे. या सगळ्यात मला आदेशची पहिली प्रतिक्रिया खूपच छान वाटली तो मला म्हणाला, ‘हे तुझ्या आतापर्यंतच्या कामामधील मला सर्वात आवडलेलं काम आहे.’ एकंदर त्याला चित्रपटातील माझी भूमिका फार आवडली.”

हेही वाचा : Bawaal Trailer : “प्रेम, हिटलरचे शहर अन् दुसरे महायुद्ध…”, वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘बवाल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

सुचित्रा बांदेकर पुढे म्हणाल्या, “एवढेच नव्हे तर चित्रपट पाहिल्यावर माझी आई फार रडली. कारण, माझ्या आईने मला सुरुवातीपासून खूप जास्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तिलाही चित्रपट आवडला म्हणून मला खरंच छान वाटले. आमच्या संपूर्ण टीममध्ये एक सकारात्मकता होती. ही सकारात्मकता पडद्यावर आज प्रेक्षकांना दिसत आहे.”

हेही वाचा : सुपरहिट ठरलेल्या ‘जब वी मेट’ चित्रपटाचे नाव कोणी सुचवले? शाहिद कपूरने केला खुलासा; म्हणाला, “३ नावांमध्ये आम्ही…”

दरम्यान, बाईपण भारी देवा या चित्रपटाने आतापर्यंत १२ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. यामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.