मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. गेले अनेक महिने ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा हे पात्र साकारत आहे. अश्विनी नुकतीच ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकली होती, या भूमिकेचे कौतुक झाल्यावर आता लवकरच अश्विनी आणखी एका चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. यासंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
हेही वाचा : गुजरातच्या गावामध्ये अमिताभ बच्चन यांची नात चालवतेय ट्रॅक्टर; नेटकरी कौतुक करीत म्हणाले…
आगामी चित्रपटाची पहिली झलक आणि पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करत अश्विनीने लिहिले आहे की, “इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करते. आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खूप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आणि तितकाच आनंद होत आहे, कारण माझी प्रमुख भूमिका असलेला “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षकहो याही चित्रपटावर आपण प्रेम करावे… तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.”
हेही वाचा : “जय श्री राम…” ‘आदिपुरुष’मधील पहिलं गाणं पाहून प्रेक्षक भारावले; अजय-अतुलच्या संगीताने पुन्हा केली कमाल!
अश्विनीने यापूर्वी महाराष्ट्र शाहीर, बॉईज चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत, परंतु “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अश्विनीची सहकलाकार गौरी कुलकर्णी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही या पोस्टवर कमेंट करीत तिचे अभिनंदन केले आहे.