स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील पात्रावरंही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायमच चर्चेत असते. नुकतंच अश्विनी महांगडेने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अश्विनी महांगडे ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता तिने तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : अश्विनी महांगडेच्या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, म्हणाली “याचा शेवटचा भाग…”

पुण्यश्लोक धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर. या चित्रपटासाठी पहिली मीटिंग झाली आणि ही व्यक्तिरेखा, मोठी जबाबदारी मी स्वीकारली. रसिक मायबाप प्रेक्षक हो तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे तिने यात म्हटले आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी अश्विनीने “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या चित्रपटाबद्दल घोषणा केली होती. त्यात ती प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचेही तिने सांगितले होते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुशांत सोनावले करणार आहेत. तर सोमनाथ शिंदे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट येत्या २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असं म्हटलं जात आहे.