छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मालिकेतील देशमुख कुटुंबीय प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. या मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांनाही प्रेक्षकांकडून पसंती मिळते. मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखही याच मालिकेतून घराघरात पोहोचला.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिषेक लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिषेक ‘सनी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरुन चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. अभिषेकला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छाही दिल्या आहेत.
हेही वाचा >> अमेरिकन पॉर्नस्टारने शाहरुख खानला दिल्या खास शुभेच्छा, ‘पठाण’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करत म्हणाली…
‘सनी’ चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अभिषेक त्याच्या मित्राच्या भूमिकेत आहे. अभिषेकने शेअर केलेल्या पोस्टला “सनीचे दोस्त..जीवाला जीव देतात.. भांडतात..रुसतात..शिव्या घालतात…डोक्यात जातात…वैताग आणतात…पण..यांच्या शिवाय मजा नाही…आयुष्यात असे दोस्त तर पाहिजेत ना!”, असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा >> “७५व्या वर्षी अशोक सराफ यांची ऊर्जा…”, ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हेही पाहा >> Photos : शाहरुख खानला कोणी सुचवली ‘सिग्नेजर पोझ’ची कल्पना, जाणून घ्या रंजक किस्सा
अभिषेक हा चित्रपट १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. याआधी ‘ते आठ दिवस’, ’१५ ऑगस्ट’ या चित्रपटातही झळकला होता. पसंत आहे मुलगी या झी वाहिनीवरील मालिकेत तो प्रमुख भूमिकेत दिसला होता.