दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनात याबद्दल खूप उत्सुकता होती. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी महांगडे झळकणार आहे. नुकतंच यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर कायचम सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने अभिनेता अंकुश चौधरीबरोबर फोटो पोस्ट केले आहेत. त्याला तिने हटके कॅप्शन देत आणखी एक इच्छा पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
अश्विनी महांगडेचे पोस्ट
“कॉलेज संपवून कला क्षेत्रात काम मिळावे म्हणून मुंबईला आले तेव्हा माझ्या आत्याने माझा प्रेमाने, मायेने सांभाळ केला. त्यावेळी कधीतरी बोलताना आत्याने विचारले की कोणत्या हिरो सोबत काम करणार तू? आणि क्षणाचाही विलंब न करता सहज बोलले की अंकुश चौधरी.
बहुतेक तेव्हा देवी लक्ष्मी “तथास्तु” म्हणाली असावी. हिरो…… अंकुश चौधरी.
कलाकार म्हणून उत्तम काम करता यायला हवं. एवढी एक इच्छा माझी माझ्याकडून कायम असते, धन्यवाद केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि महाराष्ट्र शाहीर ची पूर्ण टीम…”, असे अश्विनी महांगडेने म्हटले आहे.
आणखी वाचा : “तुला गमावणं ही सर्वात कठीण गोष्ट”, अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन; म्हणाली “तुझे हृदय…”
दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ असे याचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार आहे. त्यासोबतच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.