सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सुधीर फडके यांच्या भूमिकेत सुनील बर्वे, तर पत्नी ललिताबाई फडके यांच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे झळकली आहे. योगेश देशपांडे दिग्दर्शित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अनेक कलाकार मंडळींसह प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचं कौतुक करत आहेत. तसेच चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं देखील कौतुक होतं आहे. अशातच ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री राधिका देशपांडेने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाविषयी खास पोस्ट लिहिली आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Rescuer brother runs away by leaving mentally ill sister but nandadeep foundation save her life
रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Kangana Ranaut and Priyanka Gandhi vadra
‘तुम्ही माझा Emergency चित्रपट नक्की पाहा’, कंगना रणौत यांच्या आग्रहानंतर प्रियांका गांधींनी दिलं ‘असं’ उत्तर

हेही वाचा – Video: “खूपच भारी दिसतायत…”, अविनाश नारकरांच्या डान्स नव्हे तर नव्या लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष, म्हणाले…

राधिकाने लिहिलं आहे, “कागद हरवला आणि गीत रामायण घडले. वनवास ज्याचा विधिलिखित होता तो राम (सुधीर) फडके. ‘या सुखांनो या’ स्वरबद्ध करता करता दुःखांना वाट करून देणारे सुधीर स्वरगंधर्व यांना मल्टिप्लेक्स मधे अनुभवले. समुद्राच्या खोल खोल गहिऱ्या तळाशी घेऊन जाणारा हा प्रवास. त्यात इंद्रधनुषी रंगांच्या सुमधूर स्वरांचे तुषार अंगावर घेत सुधीर फडके यांचा शोध घेत आपण पोहोचतो समुद्राच्या तळाशी, जिथे आपल्या अंगावरचे रंग फिके पडतात आणि दिसतो तो शून्य स्वरुपी काळा रंग. शून्यातून विश्व उभे करणारे स्वरगंधर्व सुधीर फडके गवसतात.”

“योगेश देशपांडेंची उत्कृष्ट अशी कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन नसते तर सुधीर फडके यांचे दर्शन घडले नसते. सुनील बर्वे दादानी जीव ओतला आहे, नव्हे नव्हे तो जगला आहे असे आपण म्हणू या. शरद दादा, डॉ. हेडगेवार यांची भूमिका केली आहे. तेजस्वी डोळे आणि आकृष्ट करणाऱ्या देहबोलीमुळे डॉ. हेडगेवार एका मिनिटासाठी मल्टिप्लेक्स मधे आलेत असे वाटते. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ग.दि.माडगूळकरांची भूमिका करणारे सागर तळाशिकर यांचा, कमाल काम! आणि मृण्मयी देशपांडे, आदिष वैद्य आणि सगळेच कलाकार. विशेष कौतुक निर्माते सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांचे ज्यांनी एव्हरग्रीन क्लासिक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट जगातले बाबूजी नव्या पिढीपर्यंत पोहोचवले. चित्रपट का पहावा हे मला सांगायची गरज वाटत नाही. हं कोणी पहावा तर ज्यांच्या घरी थोडेसे तरी कलेचे वातावरण आहे अशा प्रत्येकाने, विशेष करून नव्या पिढीने. चिरकाळ लक्षात रहावा म्हणून चित्रपटगृहात आजच पाहा “स्वरगंधर्व सुधीर फडके ~ रानी.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता झाला फिट, शेअर केला फोटो अन् सांगितला डाएटमंत्र

दरम्यान, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे यांच्याव्यतिरिक्त सागर तळाशीकर (ग. दि. माडगूळकर), मिलिंद फाटक (राजा परांजपे), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), धीरेश जोशी (वीर सावरकर), शरद पोंक्षे (डॉ. हेडगेवार), अविनाश नारकर असे बरेच कलाकार मंडळी झळकले आहेत.

Story img Loader