सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळा म्हणलं की प्रत्येकजण भटकंतीला बाहेर पडतचं. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता आकाश ठोसरही पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडला आहे. आकाश सध्या सह्याद्री भटकंतीवर आहे. आकाशने या भटकंतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा- “मी असंख्य वेळा…” ‘बाईपण भारी देवा’ बघितल्यानंतर ‘अशी’ होती शरद पोक्षेंची भावना, म्हणाले, “बायकांच्या मनात…”

व्हिडीओमध्ये आकाश धबधब्याच्या पाण्यात बटाटे धुताना दिसत आहे. त्यानंतर आकाशने तिथेच भजी बनवली आणि भजी पावचा आस्वाद घेतला. याचा व्हिडीओ आकाशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅपश्न देत आकाशने ‘सुख’ असं लिहिलं आहे. आकाशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक करत कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं “सुंदर आयुष्यातील खरी मजा”, दुसऱ्या युजरने लिहिलं “सह्याद्री आणि आकाश ठोसर”, आणखी एका युजरने “बिर्याणी वरून डायरेक्ट बटाटा भजी” असं म्हणत कमेंट केली आहे. तर काहींनी “भारी एकदम…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “प्रेक्षक ३०० रुपयात माझा चित्रपट का पाहतील?” शशांक केतकर स्पष्टच बोलला, म्हणाला “दाक्षिणात्य सिनेसृष्टीत…”

आकाशच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चित्रपटात आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ७ एप्रिल २०२३ रोजी आकाशचा “घर बंदुक बिर्याणी” चित्रपट प्रदर्शित झाला. आता आकाश ‘बाल शिवाजी’ चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Story img Loader