‘खुलता कळी खुलेना’, ‘तू तेव्हा तशी’, ‘तुला पाहता रे’ या मालिकांमुळे अभिनेत्री अभिज्ञा भावे घराघरांत लोकप्रिय झाली. तिने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या अभिज्ञा स्टार प्लसवरील ‘बातें कुछ अनकही सी’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो-व्हिडीओ अभिज्ञा सोशल मीडियावर शेअर करत असते. वैयक्तिक आयुष्यात अभिज्ञाने ६ जानेवारी २०२१ रोजी मेहुल पै याच्याशी लग्नगाठ बांधली. दोघांचेही अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अभिज्ञाने शेअर केलेल्या अशाच एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार स्पृहा जोशी, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले

अभिज्ञा भावेने ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेच्या सेटवरील एक खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात मातीची धुपारत पाहायला मिळत आहे. धुपारती धुरात अभिज्ञाने खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोवर मेहुलने खास कमेंट केली आहे.\

हेही वाचा : ‘मिस वर्ल्ड’ची विजेती, सलमान खानशी अफेअर ते अमिताभ बच्चन यांची सून…; चित्रपटाच्या कथेसारखं आहे ऐश्वर्या रायचं आयुष्य, घ्या जाणून

अभिज्ञाने या फोटोला “लॉस्ट इन द मुमेंट’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर प्रतिक्रिया देताना तिचा नवरा मेहुल म्हणतो, “म्हणून तुझा घसा (थ्रोट इरिटेशन) दुखतोय.” नवऱ्याच्या कमेंटवर अभिज्ञाने सहमती दर्शवली आहे. याशिवाय तिच्या अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या हटके फोटोशूटचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर सायली घरच्यांना सांगणार गरोदर नसल्याचं सत्य! ‘या’ दिवशी असेल विशेष भाग, प्रोमो आला समोर…

abhidnya bhave
अभिज्ञा भावे

दरम्यान, अभिज्ञा भावे मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ‘बातें कुछ अनकही सी’ या हिंदी मालिकेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत अभिनेता मोहित मलिक आणि मराठमोळी अभिनेत्री सायली साळुंखे प्रमुख भूमिकेत आहेत.

Story img Loader