Manipur Violence: देशाला हादरवून सोडणाऱ्या मणिपूर घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली. एवढंच नाही तर पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला. ही घटना ४ मे रोजी घडली होती. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचा उलगडा झाला. या क्रूर घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनेही या घटनेबाबत संतापजनक पोस्ट शेअर केली आहे.

“सुन्न व्हायला होतं!” मणिपूर घटनेवर हेमांगी कवीची पोस्ट; म्हणाली, “सोशल मीडियावर बोलून उपयोग नाही, पण…”

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन

“आपल्या सर्वांना काय झालयं? असं मी म्हणणार नाही. कारण, आपल्या सर्वांना माहिती आहे की काय झालं आहे. आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही आणि ज्यांना फरक पडतो ते सरळ डोळे बंद करतात. महिलांवर होणाऱ्या अन्यायाला सीमाच राहिलेली नाही,” असं अभिज्ञाने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

Abhidnya bhave post on manipur
अभिज्ञा भावेची पोस्ट

आतापर्यंत या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभरात केली जात आहे. अक्षय कुमार, रेणुका शहाणे, उर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा, हेमांगी कवी हिच्यासह अनेक कलाकारांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून संतापला अक्षय कुमार; म्हणाला, “असे भयंकर कृत्य…”

दरम्यान, “या प्रकरणात दोषींना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल. फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी मी करेन. मी लोकांना आवाहन करतो आहे की त्यांनी सुरक्षा दलांना अडवू नये,” अशी प्रतिक्रिया मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दिली आहे.

Story img Loader