मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अभिजीत केळकर सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, तीचा बाप त्याचा बाप, कधी अचानक अशा चित्रपटांमधून अभित्याने प्रेक्षकांच मन जिंकलं. नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिजीत सोशल मीडियावर सक्रिय असून अभिनयाव्यतिरिक्त आपल्या आयुष्यातल्या गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच त्याने एस एस सी टॉपर प्राची निगमचा फोटो शेअर केला आहे. त्याने शेअर केलेला हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा… शाहरुख खान लेक सुहानाबरोबर झळकणार ‘या’ चित्रपटात; ‘द आर्चिज’च्या अपयशानंतर लेकीसाठी करतोय बिग बजेट सिनेमा

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एका शालेय विद्यर्थीनीचा फोटो व्हायरल होतोय. त्या विद्यार्थीनीचं नाव आहे प्राची निगम. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषदेचा दहावी व बारावी इयत्तेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. यामध्ये सीतापूरची रहिवासी असलेल्या प्राची निगमने राज्यात पहिला क्रमांक पटकावला, तिला ६०० पैकी तब्बल ५९१ गुण प्राप्त झाले आहेत. या अव्वल आलेल्या विद्यार्थीनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिला ट्रोल केलं गेलं. तुम्ही म्हणाल ही तर कौतुकास्पद गोष्ट आहे. मग ट्रोल का केलं बर! तर त्याचं कारण असं की- त्या मुलीच्या चेहऱ्यावर असणारे केस.

तिची बुद्धिमत्ता आणि तिच्या मेहनतीचं कौतुक करायचं सोडून नेटकऱ्यांनी तिला तिच्या चेहऱ्यावरील केसामुळे ट्रोल केलं. अनेकजणांनी तिची बाजू मांडत या ट्रोलिंगला विरोधदेखील केला, असाच विरोध आता अभिजीतनेदेखील केला आहे.

हेही वाचा… लेक श्रियाच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया पिळगावकर यांची खास पोस्ट; म्हणाल्या, “नेहमीच मला एक…”

अभिजीतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर प्राची निगमचा फोटो शेअर केला आहे. यात प्राची निगमने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. “शेवटी माझ्या चेहऱ्यावरचे केस महत्त्वाचे नसून माझे मार्क्स महत्त्वाचे आहेत.” असं प्राची निगमने म्हटलंय.

हेही वाचा… “….आणि बाबांकडे जावंस वाटतं”, बाबिल खानने इरफान खान यांचा उल्लेख करत शेअर केली भावुक पोस्ट

अभिजीतने या पोस्टला “प्राची निगम मला तुझा अभिमान आहे” असं कॅप्शन दिलं आहे. यावर एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आपल्याकडे अजूनही एखाद्याच्या दिसण्यावरून पारख केली जाते. हे सगळं दुर्देवी आहे. जसं दिसते तसं नसतं म्हणून तर जग फसतं.” तर एका नेटकऱ्याने, “थोडी दाढी करायला हवी होतीस” अशी नकारात्मक कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet kelkar post for ssc topper prachi nigam who trolled for her facial hair dvr