अभिनेता अभिजीत खांडकेकर हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मालिका असो वा चित्रपट, तो नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालतो. त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतो. नुकतीच सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर केली आहे. आता ही पोस्ट सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा : “मी कधीही आई होऊ शकणार नाही, कारण…”; प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझने व्यक्त केली खंत

अभिजीत नवीन भूमिकेत कधी दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव आहे ‘बालभारती.’ या चित्रपटाचे पोस्टर त्याने मध्यंतरी शेअर केले होते. त्यावरून तो या चित्रपटात एका हटके भूमिकेत दिसणार आहे याचा अंदाज प्रेक्षकांना आला होता. परंतु त्याची भूमिका नक्की काय असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते. प्रेक्षकांच्या मनातली हीच उत्सुकता वाढवण्यासाठी अभिजीतने या चित्रपटातील त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे.

हा त्याचा फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले, “जॅकेट, गॉगल बाईक…कोणता हा ॲटीट्युड?! स्टुडंट की टिचर..? कोण आहे हा ड्यूड.. बच्चेकंपनीसोबत केलेली धम्माल तुम्हालाही नक्की आवडेल. ‘बालभारती’…२ डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात !” अभिजीतच्या या पोस्टमुळे प्रेक्षकांच्या मनातील या भूमिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढलेली पाहायला मिळत आहे. अनेक नेटकरांनी या पोस्टवर कमेंट करत “तुला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत,” असे म्हणत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : मला काम करुन ट्रोल व्हायला आवडेल- अभिजीत खांडकेकर

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या विषयाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधव, अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांच्याबरोबर अभिनेत्री नंदिता धुरी आणि बालकलाकार आर्यन मेंघजीही महत्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती स्फियरओरिजीन्स यांनी केली असून नितीन नंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बालभारती हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण मिळावे ही पालकांची तळमळ या चित्रपटातून मांडण्यात आलेली आहे.

Story img Loader