महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. त्यांचा जीवनप्रवास हा नवोदित कलाकार मंडळींसाठी नेहमी प्रेरणादायी ठरणारा आहे. नुकत्यात एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनेता अभिनय बेर्डेने ( Abhinay Berde ) त्यांच्याबद्दल इच्छा व्यक्त केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेचं ( Abhinay Berde ) ‘आज्जी बाई जोरात’ हे नाटक रंगभूमीवर सध्या चांगलंच गाजतं आहे. या नाटकात अभिनयबरोबर अभिनेत्री निर्मिती सावंत, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, पुष्कर क्षोत्री हे कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. पहिले एआय महाबालनाट्य असलेल्या ‘आज्जी बाई जोरात’ या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच अभिनय बेर्डेने ‘आरपार’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा – Navari Mile Hitlerla: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमात लीलाने घेतला भन्नाट उखाणा, म्हणाली, “आजी एजेंचं नाव घेऊन वचन देते…”

मुलाखतीत अभिनय बेर्डेला ( Abhinay Berde ) विचारलं की, आता बाबा असते तर तुम्ही एकमेकांबरोबर कसं वाइब (Vibe) केलं असतं. यावर अभिनय म्हणाला, “काय माहिती नाही यार. कारण बाबा असते तर मी कदाचित व्यक्तीच वेगळा असतो ना. कदाचित हा कदाचित. पूर्णपणे नाही, पण कदाचित वेगळा असतो. मला माहिती नाही, काय असतं, काय वाइब (Vibe) असती. आता जर ते आले तर आता वाइब (Vibe) काय आहे ते मी सांगू शकतो. तेव्हा काय असती ते मला माहित नाही.”

माझा थोडासा स्वभाव बाबांसारखा आहे – अभिनय बेर्डे

पुढे मुलाखतदार म्हणाली की, नाही मी आताचंच म्हणतेय. त्यावर अभिनय ( Abhinay Berde ) म्हणाला, “आता अचानक आले तर काय माहिती यार. मला खूप आवडेल त्यांनी माझं नाटक बघितलं तर. नाटकाची अनाउन्समेंट त्यांच्या आवाजात आहे. एआयमधून रिक्रिएट केली आहे. त्यामुळे त्यांनी नाटक बघितलं माझं तर खूप मजा येईल. माझी खूप इच्छा होती ते असते तर ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ हे त्यांचं जे नाटक होतं ते करायला त्यांच्याबरोबर मजा आली असती. वाइब (Vibe) काय असती त्यांच्याबरोबर माहिती नाही. म्हणजे ते स्वतः खूप हजरजबाबी होते. माझा थोडासा स्वभाव त्यांच्यासारखा आहे. थोडासा आईसारखा आहे. त्यामुळे मला असं वाटतं, मस्त वाइब (Vibe) असती.”

हेही वाचा – Video: युरोपहून एका महिन्याची सुट्टी एन्जॉय करून परतले पतौडी कुटुंब, धाकट्या लेकाबरोबर मस्ती करताना दिसला सैफ अली खान

पुढे अभिनयला ( Abhinay Berde ) विचारलं, “आईसारखा म्हणजे कसा?” तर अभिनय म्हणाला, “आईसारखा म्हणजे जिद्द जी आहे ती मला आईकडून मिळाली. तसंच राग मला आईकडून मिळतो. पण परत विनोदबुद्धी थोडीशी वडिलांकडून मिळाली आणि मला क्षितीज सर म्हणतात, मी नाही म्हणत. की टायमिंग पण त्यांच्याकडून मिळाला आहे.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhinay berde expressed about father laxmikant berde pps