मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’, ‘शेर शिवराज’, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटांनंतर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचीही काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली. या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये ‘पावनखिंड’चं नाव आवर्जुन घेतलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ हा चित्रपट २०२२च्या फ्रेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. या चित्रपटातील गाणी व संवादांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. शूरवीर बाजीप्रशू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान व त्यांच्या शौर्याची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली होती. पावनखिंडमध्ये अभिनेता अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे तर चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती.

हेही वाचा >> आलिया-रणबीरच्या मुलीचं नाव ठरलं, ऋषी कपूर यांच्याशी असणार खास कनेक्शन

‘पावनखिंड’ चित्रपटातील एक व्हिडीओ अजय पूरकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. पावनखिंडीतील छत्रपती शिवाजीमहाराज व बाजीप्रभू देशपांडे यांच्या शेवटच्या भेटीचा हा सीन आहे. “स्वतःच्या जीवाची बाजी लावून घोडखिंड लढवणारे बाजीप्रभू देशपांडे जेव्हा छत्रपती शिवरायांचा निरोप घेतात…पुन्हा पुन्हा पाहावा असा ‘पावनखिंड’मधील हा हृदयस्पर्शी प्रसंग!” असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. अजय पूरकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा >> “मी साडीत सेक्सी…”, शरीरप्रदर्शन करण्यावरुन श्रीदेवी यांनी केलं होतं बोल्ड वक्तव्य

हेही वाचा >> Video: दीड महिन्यांपूर्वी आईला गमावलं, आता वडिलांना शेवटचा निरोप देताना महेश बाबूला अश्रू अनावर

अजय पूरकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. घराचे फोटो त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ajay purkar shared chhatrapati shivaji maharaj and bajiprabhu deshpande scene of pawankhind movie video kak
Show comments