केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. हळूहळू या चित्रपटाबद्दल नवीन नवीन गोष्टी समोर यायला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार आहे हे काही महिन्यांपूर्वीच समोर आलं होतं. त्यानंतर आता हळूहळू या चित्रपटातील इतर व्यक्तिरेखांचाही उलगडा होऊ लागला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात साने गुरुजी यांची भूमिका कोण साकारणार हे नाव आज जाहीर करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तर आज साने गुरुजी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

आणखी वाचा : Photos: दाराबाहेर पत्रपेटी, जुना लाकडी दरवाजा…’असं’ आहे शाहीर साबळे यांचं मुंबईतील घर

साने गुरुजी आणि शाहीर साबळे यांच्यात गुरु शिष्याचं नातं होतं. त्यामुळे ही भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्टर शेअर करत ही माहिती दिली. या चित्रपटात साने गुरुजी यांची भूमिका अभिनेता अमित डोलावत साकारणार आहे.

ही घोषणा करताना केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “जीवनाच्या प्रवासात योग्य गुरू लाभला, तर तो आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो.. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहीर साबळे आणि त्यांचे गुरू साने गुरुजी.. वेळोवेळी शाहीरांच्या जीवनात येऊन त्यांना दिशा देणारे आणि त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या घडामोडींचे कारण असलेले साने गुरुजी ह्यांचा आज जन्मदिवस.. त्याच प्रित्यर्थ तुमच्या समोर सादर करतो आहोत ‘महाराष्ट्र शाहीर’ ह्या सिनेमातील साने गुरुजी ह्यांची पहिली झलक.. साने गुरुजींच्या भूमिकेत अमित डोलावत….. गुरू शिष्याचं एक आदर्श नातं उलगडणार…२८ एप्रिल २०२३ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टीमने पसरणी येथे केले शाहीर साबळे यांच्या फोटोचे अनावरण, पहा त्यावेळची खास क्षणचित्रे

अमित डोलावत या आधी ‘लक्ष्य’ या मालिकेत झळकला होता. त्या मालिकेत त्याने अर्जुन करंदीकर नावाच्या पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता तो ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साने गुरुजींच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याने तेही खूप खुश झाले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor amit dolawat will be playing role of sane guruji in maharashtra shahir film rnv