‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. या मालिकेमध्ये अभिनेते अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने महाराणी येसूराणी यांची भूमिका साकारली होती. ही ऐतिहासिक मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. अमोल कोल्हे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे कामाबाबत तसेच खासगी आयुष्याबाबत विविध पोस्ट शेअर करत असतात.
अमोल यांनी आताही इन्स्टाग्रामद्वारे शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. मध्यंतरी अमोल यांच्या मानेला दुखापत झाली होती. यादरम्यानचे काही फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता याबाबतच एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. अमोल त्यांचा एमआरआय रिपोर्ट बघताना दिसत आहेत.
आणखी वाचा – अभिनयासह आता महेश मांजरेकरांच्या मुलाने सुरू केलं स्वतःचं हॉटेल, नावही आहे फारच खास
अमोल यांनी या व्हिडीओ शेअर करताना लिहिलेलं कॅप्शन विशेष लक्षवेधी आहे. अमोल यांनी म्हटलं की, “दुखावलेली मान सांभाळत स्वतःचे एमआरआय (MRI) रिपोर्टस् पाहून एमबीबीएसमध्ये शिकलेलं काही आठवतंय का? याची खात्री करुन पाहिली. शेवटचा पर्याय आहे रेडिॲालॅाजिस्टने दिलेला रिपोर्ट वाचणे. (मान(ो)या ना मान(ो)”.
आणखी वाचा – खरंच की काय! ही सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे सहा मुलांची आई? मुलाखतीत केला अजब खुलासा
अमोल यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. तसेच त्यांना मानेची काळजी घेण्याचा सल्ला चाहत्यांनी दिला आहे. सलील कुलकर्णी यांनीही केलेली कमेंट विशेष लक्षवेधी आहे. ते म्हणाले, “माझं पण अगदी असंच होतं. मधूनच थोडं थोडं आठवतं”. अमोल यांच्या या व्हिडीओला १९ हजारपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.