अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. एक गुणी आणि चांगला माणूस अशी त्याची ओळख आहे. आता पहिल्यांदाच त्याने त्याच्या व्यसनाबाबत भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भूषण प्रधानने नुकतीच सुलेखा तळवलकर हिच्या युट्युब चॅनलवरील ‘दिल के करीब’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याने त्याच्या करिअरबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलासपणे भाष्य केलं. यावेळेस त्याने त्याला दारू, सिगारेट नाही पण एका वेगळ्याच गोष्टीचं व्यसन असल्याचा खुलासा त्याने केला.

आणखी वाचा : आई-वडील एकत्र राहत असूनही भूषण प्रधान ‘भूषण सीमा प्रधान’ नाव का लिहितो? अभिनेत्याने दिलेल्या उत्तराने वेधलं लक्ष

तो म्हणाला, “मी एमबीए केलं असल्यामुळे मला माझ्या पैशांचं योग्य नियोजन करता येतं. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडतो की माझी काम तर फार दिसत नाहीत पण तरीही हा इतकी चांगली लाईफस्टाइल कसा काय जगतो? याचं उत्तर म्हणजे, मला माझ्या पैशांचं योग्य नियोजन करता येतं, एकटाच राहत असल्यामुळे माझ्यावर आई-बाबांची जबाबदारी आहे पण तेही आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे त्याचाही विचार मला करावा लागत नाही. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी की मला दारू, सिगारेट असं कुठलंही व्यसन नाही, त्यामुळे किती पैसा वाचतो!”

हेही वाचा : “ते दोघेही माझे…”, पूजा सावंतने केलं वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरच्या नात्यावर स्पष्ट भाष्य, म्हणाली…

पुढे तो म्हणाला, “मला शॉपिंग करायला खूप आवडतं. मला कपडे खूप आवडतात. त्यामुळे मी खूप शॉपिंग करत असतो. कधी कधी त्याने गिल्टही येतो की आपण खूप शॉपिंग करतो आहोत का? पण तेव्हा असा विचार येतो की मी जर सिगारेट ओढत असतो किंवा दारू पीत असतो तर त्यावर किती खर्च झाला असता! त्यातलं मी काहीही करत नाही त्यामुळे ते पैसे जर शॉपिंगवर खर्च केले तर त्यात काहीही हरकत नाही. त्यामुळे मला हे एक कपडे खरेदी करायचं व्यसन आहे असं मी म्हणेन.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor bhushan pradhan revealed about his shopping addiction rnv