अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. त्याचे आई-वडील एकत्र राहत असूनही तो पूर्ण नाव लिहिताना ‘भूषण सीमा प्रधान’ असं लिहितो. म्हणजेच त्याच्या आणि आडनावाच्या मध्ये वडिलांच्या नावाऐवजी तो त्याच्या आईचं नाव वापरतो. आता त्याने हा निर्णय का घेतला याचं कारण त्याने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूषण प्रधानने नुकतीच सुलेखा तळवलकर हिच्या युट्युब चॅनलवरील ‘दिल के करीब’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याने त्याच्या करिअरबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलासपणे भाष्य केलं. यावेळेस त्याने पूर्ण नाव लिहिताना मध्ये वडिलांच्या ऐवजी आईचं नाव वापरण्यामागचं कारणही स्पष्ट केलं.

आणखी वाचा : “ते दोघेही माझे…”, पूजा सावंतने केलं वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरच्या नात्यावर स्पष्ट भाष्य, म्हणाली…

सुलेखा तळवलकर ही नाही याबद्दल त्याला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “आई-वडिलांचं पटत नाही किंवा त्यांचा घटस्फोट झाल्यावर आपण आपल्या नावापुढे आईचं नाव लावतो असं अनेकांना वाटतं. पण मी माझ्या वडिलांवरही तितकंच प्रेम करतो. तुला घडवण्यामध्ये दोघांचाही वेगवेगळ्या वाटा आहे. पण आईचा तो कुठेतरी जास्त आहे. जिने माझ्यासाठी कष्ट घेतले आहेत, मी अभिनय क्षेत्रात काम करा व हे स्वप्न माझ्याबरोबर पाहिलं आहे…जेव्हा मी बाबांना सांगायचो की मला अभिनेता व्हायचं आहे तेव्हा माझं एमबीए झालं असल्यामुळे बाबा मला म्हणाले होते की तुला जर तुझी ही आवड झोपायची असेल तर तुला त्यासाठी पैसे उभे करावे लागतील मी काहीही देणार नाही. पण आईने तसं केलं नाही. तुला काय करायचं आहे? मग आपण ते कसं करू शकतो? त्यासाठी काय काम करावं लागेल? याबाबत ती माझ्याशी चर्चा करायची. तिने मला कधीही कुठलं काम करायला आडवलं नाही. त्या काळामध्ये मी छोट्यातली छोटी काम करूनही पैसे मिळवले आहेत.”

हेही वाचा : तेजश्री प्रधानचं शिक्षण किती हे माहीत आहे? आधी करायची ‘या’ क्षेत्रात काम

पुढे तो म्हणाला, “पुण्यात एमजी रोडच्या सिग्नलवर मी पॅम्प्लेट वाटले आहेत. ते काम करण्याचे मला दीडशे रुपये मिळायचे आणि ते जमवून मी माझा पोर्टफोलिओ तयार केला. मी याला स्ट्रगल नाही म्हणणार. कारण घरात पैसे होते पण आपल्याला जर आपल्या करिअरसाठी हे सगळं करावं लागत असेल तर चांगलं आहे. त्यामुळे त्याची एक खूप मोठी किंमत आहे. सगळं करत असताना मला आईने खूप पाठिंबा दिला. हे करू नकोस किंवा हे करायला नको असं तिने मला कधीच सांगितलं नाही. कसं करणार आहेस? हा प्लॅन ती मला विचारायची. त्यामुळे मी जेव्हा अभिनेता झालो तेव्हा मी असं ठरवलं होतं की आपण वडिलांचं आडनाव तर लावतो. किंवा पूर्ण नावात त्यांचं नाव लिहिल्यामुळे त्यांचं नावही सर्वांना कळतं. पण जिने आपल्यासाठी कष्ट घेतले आहेत त्या आईचं नाव कुणालाही कळत नाहीये. या सगळ्यामध्ये बाबांचाही एक्सेप्टन्स आहे. ते नेहमी म्हणतात की घडवण्यामध्ये आईचा वाटा मोठा आहे, तिच्यामुळे तुम्ही आहात. त्यामुळे माझ्या या निर्णयावर त्यांनीही कधी आक्षेप घेतला नाही. माझ्यासाठी ज्या आईने कष्ट घेतले आहेत तिचं नाव सगळ्यांना कळावं म्हणून मी ‘भूषण सीमा प्रधान’ असं नाव लावतो.” तर आता भूषणने दिलेल्या या उत्तराचं खूप कौतुक होत आहे.