अभिनेते प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बलोच’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन यात घडणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर, गाणी सर्वांनाच प्रेक्षक पसंती देताना दिसत आहे. नुकतंच प्रवीण तरडे यांनी मराठी भाषेविषयी त्यांचे मत मांडले आहे.
पिंपरी चिंचवड येथे ‘दिशा सोशल फाउंडेशन’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रवीण तरडे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडे यांनी मराठी भाषेबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “माझा रोमँटिक अंदाज पाहून पत्नीला धक्का बसला”, प्रवीण तरडेंनी केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाले “ती सोडून…”
“मराठी भाषा ही अशी भाषा आहे जी भावनिक भाषा अजिबात नाही. मराठी भाषा ही भावनिक भाषा अजिबातच नाही, त्यामुळे आपल्या भाषेतल्या शिव्या देखील जिव्हारी लागतात. जेव्हा कोणी आपल्याला इंग्रजीत शिव्या देतं, तेव्हा आपल्याला राग येत नाही. पण तिची शिवी आपल्याला कोणी मराठीत दिली तर आपला संताप होतो.
कारण आपली भाषा जहरी आहे. आपली भाषा ताकदवान आहे. मराठी भाषा येणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषांमध्ये गणली गेलीच पाहिजे आणि आजही गणली जाते. कारण छत्रपती शिवाजी महाराज ही भाषा बोलत होते. त्याचवेळी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास स्वामी हे देखील हीच भाषा बोलत होते. प्रत्येकाची भाषा बोलण्याची पद्धत वेगळी होती”, असे प्रवीण तरडेंनी म्हटले.
आणखी वाचा : “पानिपत ही मराठ्यांची शेवटची लढाई नव्हती…” प्रवीण तरडेंच्या बहुचर्चित ‘बलोच’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
दरम्यान प्रवीण तरडेंनी ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ यासारखे चित्रपट दिले आहेत. प्रवीण तरडे यांना त्यांच्या ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सध्या ते ‘बलोच’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यानंतर लवकरच प्रवीण तरडे ‘मुळशी पॅटर्न २’ आणि ‘धर्मवीर २’ हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत.