मराठी अभिनेता हेमंत ढोमे चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. हेमंत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्टबद्दल हेमंत सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती देत असतो. अनेकदा तो फोटोही शेअर करताना दिसतो. नुकतचं हेमंतने मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवर एक ट्वीट शेअऱ केलं आहे. हेमंतच हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- राज ठाकरेंनी वंदना गुप्तेंच्या नव्या गाडीचं फाडलं होतं कव्हर; किस्सा सांगत अभिनेत्री म्हणाली, “मला बघताच त्याने…”

हेमंतने मुंबई- गोवा महामार्गावरील रस्त्यांवरील खड्ड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत हेमंतने लिहिलं “चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!! भीषण!”. हेमंतने या खड्ड्यांची तुलना चंद्रावरील खड्ड्यांशी केली आहे. हेमंतने ही पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. अनेक चाहत्यांनी या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेमंत ढोमेच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर त्याचा ‘झिम्मा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता नुकताच त्याचा ‘डेट भेट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता संतोष जुवेकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याचा क्षणभर विश्रांती, ऑनलाईन बिनलाईन, पोस्टर गर्ल सारखे चित्रपटही चांगलेच गाजले होते. २०१२ साली हेमंतने अभिनेत्री क्षिती जोगबरोबर लग्नगाठ बांधली. क्षितीसुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकताच तिचा करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी राणी की प्रेम कहाणी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor hemant dhome shared photos of pothole on mumbai goa highway tweet viral dpj