अभिनेता हेमंत ढोमे व अभिनेत्री क्षिती जोग हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. हेमंत ढोमे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने पत्नी क्षितीबरोबरचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.हेमंत ढोमे व क्षिती जोग ‘झिम्मा’ नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘सनी’ हा नवाकोरा सिनेमा घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सनी’ या चित्रपटाबद्दल हेमंतने पोस्ट लिहिली आहे. “सनी…क्षिती आणि माझं दुसरं बाळ…आमच्या पहिल्या बाळाला म्हणजे ‘झिम्मा’ला तुम्ही बोर्डात आणलंत, भरभरून प्रेम दिलंत, त्याला डोक्यावर घेतलंत…’सनी’ हे आमचं बाळ थोडं हट्टी आहे, द्वाड आहे, प्रचंड मस्तीखोर आहे. पण खूप जास्त प्रेमळ आहे…आणि आम्हाला खात्री आहे, ते तुम्हा प्रेक्षकांचं बोट धरून मोठं होणार…त्याला सांभाळुन घ्या! उद्यापासुन आमचं कारटं तुमच्या भेटीला येतंय…तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असुदे…” असं हेमंतने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> Shraddha Murder Case: ‘डेक्सटर’ पाहून आफताबप्रमाणेच कुणी भावाचा, तर कुणी आईचा केला खून; एका दिग्दर्शकाचाही समावेश

हेही वाचा >> तमन्ना भाटिया व्यावसायिकाबरोबर थाटणार संसार? फोटो शेअर करत म्हणाली…

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. घरापासून परदेशात दूर वास्तव्यास असणाऱ्या सनी नावाच्या मुलाची ही गोष्ट असणार आहे. या चित्रपटात ललितसह चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

हेही वाचा >> शिव ठाकरे-वीणा जगतापचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘ते’ फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात “गौतम-सौंदर्याची खिल्ली उडवणारा…”

‘सनी’ या चित्रपटाच्या प्रीरिलीज शोही ठिकठिकाणी पार पडले. या शोलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. हेमंत ढोमेसह व ललितसह चित्रपटातील कलाकरांनी थेट चित्रपटगृहांत जाऊन संवाद साधल्याचं बघायला मिळालं.