अभिनेते व नेते किरण माने यांची उद्धव ठाकरेंबद्दल एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ केलं नाही, असं म्हटलंय. तसेच राजकारणात पवारसाहेब, राहुल गांधी, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते, असंही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलंय.

“उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ नाही केले! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले.
समजा एखादा अभिनेता महान आहे.. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्‍याला, हुबेहुब दिसणार्‍या कलाकाराला देतात का? नाही. गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते.
… बाळासाहेबांचं नांव ‘कॅश’ करणं उद्धवजींना अवघड नव्हतं. “माझ्या उद्धवला सांभाळा” ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं.
आपण नेहमी म्हणतो बघा. ‘आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खुप ट्रोल झाले असते.’
….तसंच आज जे बाळासाहेबांचं नाव ‘वापरणार्‍यांनी’ही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते.
बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भुमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नावाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धवजी करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत.
आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते. पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. पवारसाहेब, राहुल, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते. स्थानिक काँग्रेसचा दबाव असून सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काँग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडीया आघाडीच्या मिटींग्जमध्ये उद्धवजींच्या शब्दाला वजन असते.
आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं. ‘जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची’, हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा! तो उद्धवजींमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय.
हे बघा… तो त्याच्या बापाचं नाव लावतो. उसन्या बापाची गरज नाही त्याला. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाम ही काफी है,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

Aditya Thackeray criticizes Amit Shah,
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ‘काँग्रेसनेही बाबासाहेबांचा अपमान केला’ विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, “दुसऱ्याने शेण खाल्लं…”
Chhagan Bhujbal
“ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…”, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis Rahul Narwekar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीस, राहुल नार्वेकरांची भेट; सुनील प्रभूंनी सांगितलं नेमकी चर्चा काय झाली?
Shambhuraj Desai On Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून शंभुराज देसाई यांचं आव्हान; म्हणाले, “त्यांची नावं सांगा, मग आम्ही…”
Uddhav Thackeray Maharashtra Cabinet Expansion Mahayuti
Uddhav Thackeray : महायुतीमधील नाराज नेते तुमच्या संपर्कात आहेत का? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, “मला त्यांचे निरोप…”
Uday Samant, Uday Samant on Uddhav Thackeray,
“उद्धव ठाकरेंनी आमदारांना प्रशिक्षण द्यावे, परंतु आत्मचिंतन…”, उदय सामंत यांचा टोला

या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘काही युत्या आघाड्या निवडणुकी पलीकडे असतात,’ ‘आता राजकारण एवढं गचाळ झालं आहे की देश कुठे जाणार कळत नाही आहे.. पणं म्हणून नरेंद्र मोदी वाईट आणि इंडी वाले सर्व चांगले असं पणं नाही होत… सर्व एका माळेचे मणी..’ अशा कमेंट्स युजर्सनी या पोस्टवर केल्या आहेत.

Story img Loader