राज्यात अनेक ठिकाणी मराठा जातीय सर्वेक्षण केले जात आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी या सर्वेक्षणासाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. मराठी अभिनेता पुष्कर जोग याच्याघरीही बीएमसीमधील महिला कर्मचारी सर्वेक्षणासाठी आली होती. त्यानंतर पुष्करने सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला होता. त्याला उत्तर देत अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी आव्हान दिलं आहे. नेमकं काय घडलंय? ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होती पुष्कर जोगची पोस्ट

“काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार” अशी स्टोरी पुष्कर जोगने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती.

पुष्कर जोगची पोस्ट

“…तर २ लाथा मारल्या असत्या”, BMC च्या कर्मचाऱ्यांनी जात विचारल्यानंतर पुष्कर जोगची संतप्त पोस्ट; म्हणाला…

किरण माने काय म्हणाले?

किरण माने यांनी पुष्करसंदर्भातील ‘लोकसत्ता’ ची पोस्ट शेअर करत फेसबूकला लिहिलं, “आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय…” मी परवाच दिलेल्या मुलाखतीत बोललो.
दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग नावाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.”
अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे.
तुला लाथाच घालायच्यात ना???
लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा???
…मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल. खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या.
बोल.
आहे दम तुझ्या पार्श्वभागात???
अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनावं घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनावांचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कसला माज दाखवतो तू??? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवून तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा.
बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा.
मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात राहा,” असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, किरण माने यांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. अनेकांनी किरण माने यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. चाहते या पोस्टवर लाइक्स व कमेंट्स करून ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane slams pushkar jog over his post bmc employee caste survey hrc