ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आणि त्यांच्या कामाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुकही झालं. त्यांनी ‘देऊळ बंद’ या चित्रपटामध्ये स्वामी समर्थांची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारल्यानंतर त्यांना प्रेक्षकांचा आलेला एक अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

२०१५ साली ‘देऊळ बंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा दिग्दर्शन केलं होतं. तर मोहन जोशी, डॉ. मोहन आगाशे, गश्मीर महाजनी, सतीश आळेकर, महेश मांजरेकर, निवेदिता सराफ, प्रवीण तरडे यांनी या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाबद्दल आणि त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

आणखी वाचा : “मी राज ठाकरे-शर्मिलाची प्रेमपत्रं पोहोचवायचे…,” वंदना गुप्ते यांचा खुलासा, मजेशीर किस्सा शेअर करत म्हणाल्या…

ते म्हणाले, “‘देऊळ बंद’ या चित्रपटासाठी जेव्हा प्रवीण तरडेने मला विचारलं तेव्हा ही वेगळी भूमिका ऐकून तो मला या भूमिकेसाठी का विचारतोय, असा प्रश्न मला पडला. सुरुवातीला मला आश्चर्य वाटलं. आपण या व्यक्तिरेखेचा गेटअप करू आणि मी जर त्यांच्यासारखा दिसलो तरच मी ही भूमिका साकारेन, असं मी त्याला सांगितलं. त्यानुसार चित्रपटाच्या टीमने लूकवर काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांचा गेटअप केल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि मी ही भूमिका करण्यासाठी हो म्हटलं.”

हेही वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून ‘जग्गू’ आजोबांची एक्झिट, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

पुढे ते म्हणाले, “गाडी चालवणारे, इंग्लिश बोलणारे स्वामी समर्थ प्रेक्षक स्वीकारतील का, अशी शंका मला होती. पण प्रवीणला त्यावर विश्वास होता आणि तसंच घडलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मी एकदा चंद्रपूरला गेलो होतो तेव्हा एके ठिकाणी लोकांनी माझी पूजा आणि आरतीही केली.” मोहन जोशी यांचे बोलणे आता चर्चेत आले आहे.