नाना पाटेकर हे बहुआयामी अभिनेते म्हणून ओळखले जातात. अनेक मराठी-हिंदी चित्रपटात काम करत त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चित्रपटातील डायलॉग लोकप्रिय आहेत. याबरोबरच त्यांच्या कविता, चित्रकला यांचीदेखील चर्चा होताना दिसते. नाना पाटेकरांनी नुकतीच बोल भिडू या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मित्रांच्या लग्नाच्या पत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिण्याची आठवण सांगितली आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर?

स्वतः चित्रकार असण्याचा अभिनय करताना कसा फायदा झाला? यावर बोलताना नाना पाटकेरांनी म्हटले की, तुम्हाला फ्रेम कळते ना? एखाद्या फ्रेममध्ये किती हालचाल केली पाहिजे हे समजलं पाहिजे. लाँग शॉट असेल तर हालचाल करता येते. तर ते तुम्हाला कळायला पाहिजे की ती कितीची फ्रेम आहे, तर त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण खूप काहीतरी करून जातात. लेआऊट आणि पोस्टरमध्ये तुम्हाला साईज दिली जाते ना, ती साईज माहीत असेल तर सोपं जातं.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Swapnil Joshi New Car First Look defender car
स्वप्नील जोशीने खरेदी केली आलिशान गाडी, Defender कारचा पहिला फोटो आला समोर, म्हणाला…
Rabi sowing in the country is on 428 lakh hectares
देशातील रब्बी पेरण्या ४२८ लाख हेक्टरवर; जाणून घ्या, देशभरातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र
Nana Patekar On Marathi Cinema
मराठी सिनेमे हिंदीत डब का होत नाहीत? नाना पाटेकरांचा सवाल; प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’बद्दल म्हणाले…
News About Sunil Pal
Sunil Pal : सुनील पाल बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर काही वेळातच पत्नी सरिताने दिली महत्त्वाची माहिती, “काही वेळापूर्वीच..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

पोस्टर डिझाईन केलेत का? “खूप केलेत”, असे म्हणत नाना पाटेकरांनी पुढे सांगितले, “मी स्टुडिओ लिंकमध्ये जाऊन बसायचो. आत्माराम आणि विवेक होते. विवेक गेला, फार ग्रेट आर्टिस्ट होता, मी तिथे जाऊन बसायचो.” याबरोबरच त्यांनी म्हटले, त्यावेळी मला फार इलेस्ट्रेशन जमायचं नाही, पण आता मी फार स्केचिंग करतो. सिनेमाच्या शूटिंगला गेल्यानंतर एका बाजूला पॅड असेल तर ते करत बसायचं, मजा येते करायला.

पुढे बोलताना नाना पाटेकरांनी म्हटले, “कॅलिग्राफी आणि लेआऊट हे माझे प्रिन्सिपल सब्जेक्ट होते. अक्षर माझं छान आहे. माझ्या भरपूर मित्रांच्या लग्नाच्या पत्रिका मी केल्या. ज्यांच्या ज्यांच्या लग्नाच्या पत्रिका केल्यात ती लग्न टिकली आहेत.” कोणीतरी त्यांनी लिहिलेली लग्नपत्रिका त्यांना पाठवल्याची आठवण सांगत नाना पाटेकरांनी म्हटले, “आता पस्तीस की चाळीस वर्षे झालीत लग्न होऊन, त्यांनी मला ती पत्रिका पाठवली. नाना हे बघ, तू केलेली पत्रिका. त्यातले तीन तांदूळ होते ना त्यातील दोन पडले, एक अजून चिकटलेला आहे”, अशी आठवण नाना पाटेकरांनी सांगितली आहे.

हेही वाचा: श्रद्धा कपूरने जुहूमध्ये भाड्याने घेतलं आलिशान अपार्टमेंट, महिन्याला एक-दोन नव्हे तर ‘इतकं’ लाख भाडं

u

दरम्यान, नाना पाटेकर हे त्यांच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखले जातात. याबरोबरच ते त्यांच्या परखड वक्तव्यासाठीदेखील ओळखले जातात.