ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं आहे. मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतले चतुरस्त्र अभिनेते अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरून कलाकार निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आहेत.
जयंत सावरकर गेली अनेक दशकं नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येत होते. तर स्वप्निल जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘समांतर’ या वेब सिरीजमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. त्यांना अनेक कलाकार अण्णा म्हणून हाक मारत होते. आता त्यांच्या जाण्याने कलाकार भावुक झाले आहेत.
आणखी वाचा : “कायम हसतमुख आणि…”, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सुबोध भावेने जागवल्या जुन्या आठवणी
अभिनेता निखिल राऊतने सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. जयंत सावरकर यांचा एक फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “ज्येष्ठ आणि चतुरस्त्र अभिनेते जयंत सावरकर (अण्णा) ह्यांचे दुःखद निधन. अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, पुलंचा ‘अंतू बर्वा’ अजरामर करणारा कलावंत काळाच्या पडद्याआड
निखिल राऊतने केलेली ही पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तर यावर कमेंट करत नेटकरी जयंत सावरकर यांना श्रद्धांजली वाहत आहेत.