अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक कायमत त्याच्या कामामुळे चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियावरही तो बराच सक्रिय असतो. पत्नी मंजिरी ओकबरोबर तर तो अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आताही प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क घरातील कामं करताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : “तू हात उचलायच्या लायकीचा…” अक्षय व प्रसादमध्ये हाणामारी, धक्काबुक्की केली अन्…

प्रसादने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो चेहऱ्यावरील हावभाव बदलताना दिसत आहे. तसेच या रिल व्हिडीओमधील संवाद अधिक लक्षवेधी आहेत. प्रसादचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे.

पाहा व्हिडीओ

“असं म्हणतात प्रत्येक जोडी ही वरती स्वर्गातच बनलेली असते. पण आता असं वाटतं की वरतीही काम नीट होत नाही.” प्रसाद घरातील लादी पुसत असताना व्हिडीओमध्ये हे संवाद ऐकायला मिळत आहे. तर प्रसादची पत्नी दरम्यान मोबाईलवर बोलताना दिसते.

आणखी वाचा – आली रे आली आता दीपिका पदुकोणची बारी आली; रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम ३’मध्ये साकारणार महिला पोलिसाची भूमिका

प्रसाद चेहऱ्यावरील हावभाव बदलत असताना मंजिरी इशाऱ्यानेच त्याला राग देते. पण प्रसाद घरातील लादी पुसत राहतो. या दोघांचा हा धमाल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. शिवाय नेटकऱ्यांनी प्रसाद-मंजिरीच्या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

Story img Loader