महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. गेली अनेक वर्ष त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात राज्य केले आहे. नाटक असो, मालिका असो वा चित्रपट असो; त्याच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. आता लवकरच प्रसाद ओक एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. ‘परिनिर्वाण’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला ‘महापरिनिर्वाण दिन’ असे म्हटले जाते. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निर्वाण झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
आणखी वाचा : यंदाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला “माझ्या बाबांना…”

प्रसाद ओकने नुकतंच इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘परिनिर्वाण’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये ‘६ डिसेंबर १९५६, संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा ऐतिहासिक क्षण, भारतीय संविधानाचे शिल्पकार, संस्थापक, बहिष्कृत हितकारिणी सभा, प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदान अधिकार, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे जनक, हिंदू कोड बिल, राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अशा गोष्टी लिहिलेल्या दिसत आहेत.

त्याबरोबरच या पोस्टरमध्ये “६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले आणि त्याच दिवशी…. सत्य घटनेवर आधारित एका कलावंताच्या आयुष्याचं स्वप्न, प्रेम, त्याग, संघर्ष, दु:ख, जतन केला त्याने इतिहासाचा अमूल्य ठेवा… एक कॅमेरामन, ३००० फुटांची रीळ आणि लाखो लोकांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘निर्वाण यात्रा’. चित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला एक अवलिया कलाकार नामदेव व्हटकर”. असे या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे.

आणखी वाचा : ‘धर्मवीर’साठी प्रसाद ओकचा गौरव, पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाला “एक ब्लॅक लेडी…”

प्रसाद ओकने ‘परिनिर्वाण’ या चित्रपटाचे इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर केले आहे. “धगधगत्या अग्नीतून नव्या युगाचा प्रारंभ आहे… अंत नसून हा आरंभ आहे…!!! ‘परिनिर्वाण’ लवकरच”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेक कलाकारांनी त्याच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अभिनेता शशांक केतकरने फायर इमोजी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तर सिद्धार्थ जाधवने ‘कडक’ असे म्हणत कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor prasad oak parinirvana marathi movie motion poster release nrp
Show comments