मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परबचा आज वाढदिवस आहे. टाइमपास चित्रपटातून प्रसिद्धी मिळविलेल्या प्रथमेशने उर्फी, टकाटक या चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. प्रथमेशच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूबद्दलही गेल्या अनेक दिवसांपासूनही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

दिवाळीत प्रथमेशचे अभिनेत्री क्षितिजा घोसाळकरबरोबरचे काही फोटोही व्हायरल झाले होते. आता त्याच्या वाढदिवसानिमित्त क्षितिजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रथमेशबरोबरचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने “काय लिहू अरे तुझ्याबद्दल! म्हणजे फक्त Happy Birthday to you लिहून सुद्धा wish करता आलं असतं मला, पण तुझं कौतुक करायला मला नेहमीच आवडतं आणि त्यातून आज निमित्त वाढदिवसाचं! मग ही संधी मी कशी बरं सोडेन?” असं सुरुवातीला म्हटलं आहे.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Steve Jobs letter
Kumbh Mela 2025 : स्टीव्ह जॉब्सनी वयाच्या १९व्या वर्षी लिहिलेल्या पत्राचा ‘इतक्या’ कोटींना लिलाव, कुंभमेळ्यात जाण्याची व्यक्त केली होती इच्छा
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

हेही वाचा>> सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…

पुढे क्षितिजाने “गेली अनेक वर्षं मी तुझा अभिनय , डान्स बघतेय, ज्यात तू नेहमीच Best असतोस. पण अलीकडील काही वर्षे तुझ्यातील अभिनेत्या बरोबरच तुझ्यातील माणूसपण अनुभवतेय! फिल्म लहान असो किंवा मोठी, त्यात तुझे सीन्स कमी असोत किंवा जास्त, ते तू मनापासूनच करतोस. प्रचंड बरं नसतानाही शूटिंग, प्रमोशन, डान्स प्रक्टिस, हे सगळं तू तितक्याच डेडिकेशनने करतोस. बरं हे सगळं करत असताना कित्येकदा होणारं ट्रोलिंग अजिबात मनावर न घेता किंवा स्वतःची मानसिक स्थिती बिघडवू न देता, ती गोष्ट हसण्यावारी घेऊन तुझ्या कामातून, तुझ्या performance मधून एकदम चोख उत्तर देतोस. आणि इतकं सगळं करून सुद्धा कोणत्याही गोष्टीचा तसूभरही गर्व न करता, सतत काहीतरी नवीन शिकण्याचा ( मग ते शून्यापासून का असेना) तुझा अट्टाहास वाखाणण्याजोगा असतो.”, असं लिहिलं आहे.

हेही वाचा>> “कश्मीर पंडितांच्या…” IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी चित्रपटाचा ‘व्हल्गर’ उल्लेख केल्यानंतर ‘द कश्मीर फाइल्स’मधील अभिनेता संतप्त

“सतत हसणं आणि इतरांना हसवणं, समजून घेणं, समजून सांगणं, कधीतरी अगदीच लहान तर कधीकधी खूप Mature, समोरच्यातील एखादी लहानशी गोष्टही appreciate करून त्याला motivate करणं…..! सगळं किती सहजपणे करतोस रे तू. बऱ्याचदा अभिनेता म्हटलं की त्याच्या ऑन स्क्रीन भूमिकेमुळे ,तो रिअल लाईफमध्येही तसाच असावा असं पटकन गृहित धरलं जातं. पण 70MM च्या पडद्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त pure आहे, Honest आहे आणि कायम असाच रहा”, असं म्हणत क्षितिजाने प्रथमेशला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> “मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

क्षितिजाने वाढदिवशी केलेल्या या पोस्टमुळे प्रथमेश व तिच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. चाहत्यांनी या पोस्टवर तशा कमेंटही केल्या आहेत.

Story img Loader