मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी एका मागोमाग एक विवाहबद्ध होत आहेत. मराठी कलाविश्वातीलही अनेक जोड्यांनी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांच्या शाही विवाहसोहळ्याची क्रेझ गेली अनेक दिवस होती. आता मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रथमेशने नवरदेवासारखा पोशाख केला आहे. शेरवानी घालून, डोक्याला मुंडावळ्या बांधून व हातात हार घेऊन प्रथमेश फोटोत उभा आहे. याबरोबरच त्याने लग्नाचं थेट आमंत्रणही दिलं आहे. “आमचं ठरलं आहे. लग्नाला यायचं हं…” असं या फोटोवर लिहीलं आहे. प्रथमेशच्या या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे प्रथमेश विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
हेही वाचा>>फिफा वर्ल्ड कपवर अर्जेंटिनाने नाव कोरल्यानंतर गौरव मोरेने शेअर केला लिओनेल मेस्सीचा फोटो, म्हणाला…
“सगळे विचारत आहेत…विचार केला सांगूनच टाकू…गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा!”, असं म्हणत प्रथमेशने हा फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी प्रथमेश नवीन चित्रपट घेऊन येत असल्याचा अंदाज लावला आहे. तर काहींनी प्रथमेशला शुभेच्छाही दिल्या आहेत.
हेही वाचा>>“महाराजांचे नाव घेऊन सनातनी हिंदूला मारणे, हे…” केतकी चितळेचं वक्तव्य चर्चेत
प्रथमेश परबने अल्पावधीतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘टाइमपास’ चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेल्या प्रथमेशने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. त्यानंतर ‘टकाटक’, ‘टाइमपास’ २ व ३, ‘उर्फी’ या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नुकताच तो ‘दृश्यम २’ या चित्रपटातही दिसला होता.