‘बालक पालक’, ‘टाइमपास’ चित्रपटांमुळे प्रथमेश परब प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘टाईमपास ३’, ‘टकाटक’, ‘टकाटक २’ हे त्याचे चित्रपट अधिक चर्चेचा विषय ठरले. त्याशिवाय हिंदीमधील ‘ताजा खबर’ वेबसीरिजमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. प्रथमेशने आतापर्यंत मराठीमधील बोल्ड चित्रपटांमध्ये अधिक काम केलं आहे. याचबाबत त्याने आता भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या आधी ‘हे’ काम करायचा दत्तू मोरे; त्या एका प्रसंगानंतर नशिब बदललं अन्…

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रथमेशला बोल्ड मराठी चित्रपटांमध्य काम करण्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी तो म्हणाला, “चौकटीबाहेर जाऊन काम करण्याची माझी कोणतीच इच्छा नाही. कारण माझ्या गुरुंनी मला सांगितलं आहे की, जे तुला येतं ते अगदी तू मनापासून कर. मी तेच फॉलो करतो.”

“मला जे येतं ते मी अगदी मनापासून करतो. वेगळं काही करुन माती खाण्यापेक्षा जे येतं ते मी करतो. मला यामध्ये काही चुकीचं वाटत नाही. ‘ताजा खबर’ या वेबसीरिजने माझी चौकट वगैरे मोडली असं काही नाही. फक्त हा महाराष्ट्राबाहेर मी पोहोचलो.”

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने व स्नेहल शिदम रिलेशनशिपमध्ये? शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

पुढे तो म्हणाला, “मराठी चित्रपटांमध्ये मी जसं काम करतो तसंच मी ‘ताजा खबर’मध्येही काम केलं आहे. ‘टकाटक’मध्ये मी जी भाषा वापरली तिच भाषा मी ‘ताजा खबर’मध्ये वापरली. पण या सीरिजमधलं काम लोकांना आवडलं. आणि ‘टकाटक’ त्यांना वाईट वाटला. हे बदल कुठेतरी झाले पाहिजे. मराठीमध्ये असं काही दाखवलं तर लोकांना मराठी संस्कृतीची आठवण होते. पण आता हा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे. प्रथमेशचा आता ‘ढिशक्यांव’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.