पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यात अभिनेते प्रवीण तरडे यांचा अंगावर काटा आणणारा लूक पाहायला मिळत आहे.
पानिपतचा पराभव मराठ्यांसाठी महाप्रलयच ठरला. या पराभवानंतर बलुचिस्तानात मराठ्यांना गुलामगिरी पत्करावी लागली. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे. ‘बलोच’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही विजयगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : Exclusive Video : ‘घर बंदूक बिरयानी’ नंतर नागराज मंजुळेंच्या आगामी चित्रपटाचे नाव ठरले, अमेय वाघबरोबर शेअर करणार स्क्रीन
नुकतंच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांच्या नजरेत मराठ्यांना मिळणाऱ्या वागणुकीविरोधात धगधगणारी आग आणि सूड भावना दिसत आहे. तर मराठ्यांवर अत्याचार करणारा अफगाणी यात पाहायला मिळत आहे.
येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि किर्ती वराडकर प्रस्तुत ‘बलोच’ चित्रपटात प्रवीण तरडे, अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.