शंभराव्या अखिल भारतील मराठी नाट्य संमेलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात व्यासपीठावर आपलं मत मांडताना राज ठाकरेंनी मराठी कलाकारांना खडसावलं होतं. मराठी कलाकार एकमेकांना जाहीरपणे अंड्या, पुष्क्या, आद्या, पद्या, शेळ्या, मेंढ्या अशी हाक करतात. शेकडो लोकांसमोर अशी हाक मारणं अत्यंत चुकीचं आहे. याने लोक तुमचा आदर कसा करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. यावर आता ‘मुसाफिरा’ चित्रपटातील कलाकार पुष्कर जोग, पूजा सावंत व दिशा परदेशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुसाफिरा’च्या संपूर्ण टीमने नुकतीच ‘लोकसत्ता ऑनलाइन डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरेंनी नाट्य संमेलनात उपस्थित केलेल्या मराठी कलाकारांच्या टोपणनावाच्या मुद्द्यावर अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, “मी राज ठाकरेंच्या मताशी अगदी सहमत आहे. कलाकारांना एकमेकांबद्दल आदर नाहीच आहे. पण, दुसरी गोष्ट अशी की, आपल्या मराठी माणसांना एकमेकांचं चांगलं झालेलं बघवत नाही. आदर करणं ही पुढची गोष्ट झाली. आधी कलाकारांना एकमेकांबद्दल जो फक्त मत्सर वाटतो ते कमी झालं पाहिजे. इतर चित्रपटसृष्टीत नेहमीच एकजूट पाहायला मिळते. त्या एकजूटीचा मराठी कलाविश्वात अभाव आहे. मी माझ्या सहकलाकारांना वैयक्तिकरित्या काही बोलेन पण, लोकांसमोर त्यांची अजिबात चेष्ट करणार नाही. सगळ्यांसमोर आदरानेच हाक मारायची ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवतो.”

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
amit thackeray on raj thackeray cried
“…तेव्हा मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले”, अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग!
raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?
raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024
Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”!

हेही वाचा : “काही वर्ष…”, लग्नानंतर अभिनेत्री पूजा सावंत ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार का? म्हणाली…

पूजा सावंत याविषयी मत मांडताना म्हणाली, “राज ठाकरेंनी अगदी योग्य मुद्दा उपस्थित केला. मलाही असं वाटतं की, आपल्याकडे एकमेकांप्रती अजिबात आदर नाहीये. आपण टीव्हीवर अनेक पुरस्कार सोहळे पाहतो. या सोहळ्यांमध्ये अनेकदा कलाकारांची चेष्टा केली जाते किंवा होस्ट खिल्ली उडवतात. मला तो अपमान वाटतो. आपण चेष्टा आहे म्हणून सोडून देतो पण, तो एकप्रकारचा अपमान असतो. कारण, पुढे जाऊन सगळे प्रेक्षक हे कार्यक्रम पाहत असतात. त्यांनाही असं वाटतं आपण असे जोक या संबंधित कलाकारबरोबर करू शकतो. त्यामुळे मलाही असं वाटतं की, आदर अन् एकजूट या गोष्टी आपल्याकडे अजिबात नाहीयेत. हे शंभर टक्के खरं आहे.”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’च्या शूटिंगसाठी माथेरानला पोहोचली जुई गडकरी! ‘ते’ दृश्य पाहून केली पर्यटकांची कानउघडणी

मुसाफिरा चित्रपटातील अभिनेत्री दिशा परदेशी याबद्दल म्हणाली, “समजा पूजा-पुष्कर हे कलाकार माझ्या घरी येतील तेव्हा ते माझे जिवलग मित्र असतील. त्यांच्याबरोबर घरी मी काहीही बोलेन…पण चारचौघात आपल्या सहकलाकारांना सन्मान देणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण, प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख असते आणि ती जपणं आपलं काम आहे.”

दरम्यान, पुष्कर जोग, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी, पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला मुसाफिरा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.